आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेला धक्के देण्याचं काम सूरू आहे.
अशातच शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना, मीरा-भाइंदर शहरातील शिवसेनेचे 18 विद्यमान नगरसेवक, अनेक प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात सामील झाल्याचा दावा केला होता. मात्र सरनाईक यांनी केलेला हा दावा खोटा असल्याचा माहिती शिवसेनेचे मीरा-भाईंदरचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी दिली.
हे ही वाचा : उपमुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; चर्चांना उधाण
शिवसेनेचे काही नगरसेवक शिंदे गटात गेले असले तरी 10 ते 11 नगरसेवक आजही उद्धव ठाकरेंच्या सोबतच असल्याची प्रभाकर म्हात्रे यांनी यावेळी दिली. महानगरपालिकेत शिवसेनेचे एकूण 19 अधिकृत नगरसेवक असून त्यापैकी फक्त 8 नगरसेवक आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत काल मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र बाकीचे सर्व नगरसेवक शिवसेनेतच आहेत, असं म्हात्रे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती
मंगळवेढामध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ निवडणूकीत समविचारी गटानं केली सत्ता स्थापन
मातोश्रीचे पूर्वीचे वजन संपलं आणि याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार; मनसेची टीका