Home उस्मानाबाद तानाजी सावंत म्हणाले, आदित्य ठाकरे कोण आहेत?; आता आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर,...

तानाजी सावंत म्हणाले, आदित्य ठाकरे कोण आहेत?; आता आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

उस्मानाबाद : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना, आदित्य ठाकरे कोण आहेत?, फक्त एक आमदार. अशी टीका केली होती. यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी आदित्य उद्धव ठाकरे साधा आमदार असून, महाराष्ट्राचा आमदार आहे, असं उत्तर आदित्य ठाकरेंनी यावेळी तानाजी सावंतांना यावेळी दिलं. आदित्य ठाकरे यांनी काल तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हे ही वाचा : “ठाण्यात जोरदार राडा; जितेंद्र आव्हाडांनी बंद पाडलेला हर हर महादेव चा शो, मनसेकडून पुन्हा सूरू”

मी ज्या रस्त्याने आलो, त्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले पैसे रद्द केले गेले. याच रस्त्याचा त्रास मला झाला. मला वाटलं की, रस्त्यावर खेकडे आले की काय? अशी टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी तानाजी सावंत यांच्यावर केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“ठाण्यात जोरदार राडा; जितेंद्र आव्हाडांनी बंद पाडलेला हर हर महादेव चा शो, मनसेकडून पुन्हा सूरू”

शिंदे सरकार कधी कोसळणार?; आदित्य ठाकरेंनी सांगितला मुहूर्त, म्हणाले…

“ठाकरे गटात जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या कन्येनं हाती बांधलं शिवबंधन”