Home देश सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा

सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती के सी वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

सोनिया गांधी आणि शरद पवार यांचं फोनवर बोलणं झाल्याानंतर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

अमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि के सी वेणुगोपाल हे दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. हे स्वत: शरद पवारांशी चर्चा करणार असल्याची महिती वेणुगोपाल यांनी ट्वीट करुन दिली आहे.

Hon’ble Congress President Smt.Sonia Gandhi spoke to Shri.Sharad Pawar today morning and deputed Shri.Ahamed Patel, Shri.Mallikarjun Kharge and myself for holding further discussions with Shri.Pawar.

We three are going to Mumbai now and will meet Shri.Pawar at the earliest.

— K C Venugopal (@kcvenugopalmp) November 12, 2019