विराट कोहली व ख्रिस माॅरिसची शानदार फलंदाजी; राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचे पंजाबसमोर 172 धावांचे लक्ष्य

0
145

दुबई : आजच्या आयपीएलच्या राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावत 171 धावा केल्या. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरकडून विराट कोहलीने सर्वाधिक 39 चेंडूत 48 धावा केल्या. तर शिवम दुबेने 19 चेंडूत 23 धावा, ख्रिस माॅरिसने 8 चेंडूत 25 धावा, ईशूरू उडाणाने 5 चेंडूत 10 धावा केल्या.

दरम्यान, पंजाबकडून मोहम्मद शमी, मुरूगन अश्विनने 2, तर अर्शदिप सिंग, ख्रिस जाॅर्डनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 36 फुटांवर

पोलिसाला मारणे पडले महागात; मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर मग राज्यातील सर्व मदरसे बंद करा- अतुल भातखळकर

“अभिनेता विवेक ओबेराॅयच्या मुंबईतील घरी छापेमारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here