Home महाराष्ट्र आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा; सुप्रिया सुळेंचं आवाहन

आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा; सुप्रिया सुळेंचं आवाहन

344

मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत कोर्टाचे आभार मानले आहेत.

असंवेदनशील सरकारकडून अनेकदा चर्चा होऊनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय झाला नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

केंद्र सरकारचा अत्याचार सहन करत शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर न्याय मागतोय. परंतु त्यांच्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही किंबहुना त्यांचं म्हणणं समजून घेऊन त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, सरकारने आतातरी संवेदनशील व्हायला हवं. चर्चेची मागणी करुनही त्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं. आता सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारला संधी आहे. सरकारने सर्वांशी चर्चा करावी. शेतकरी प्रश्नावर निर्णय घ्यावा, असं आवाहन सुप्रिया सुळेंनी सरकारला केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मराठा आरक्षणाचा तिढा संपवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

राज ठाकरेंना टेनिस खेळत असताना दुखापत; हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर

“कामगारांचे लढाऊ नेतृत्व हरपले; शिवसेना उपनेते सुर्यकांत महाडिक यांचं निधन”

“भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाची लागण”