आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात सध्या औरंगजेबचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक ठिकाणी दंगली घडून आल्या आहेत. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. अशातच काल माध्यमांशी बोलताना, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मोठं विधान केलं होतं.
“सध्या देशामध्ये धार्मिक वाद वाढत चालले आहे. व्यक्तिगत कारणांमुळे समाजावर हल्लाबोल करणे अत्यंत चुकीचे आहे. मुस्लिम समाजाकडून चुका होतात तशा हिंदूकडूनही होऊ शकतात. देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्माबद्दल काळजी वाटावी, अशी सध्या त्यांची परिस्थिती आहे., असं शरद पवार म्हणाले होते. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : …तर दंगली रोखण्यासाठी मागे पुढे काही पाहणार नाही; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराचा इशारा
निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “निवडणुका जवळ आल्या की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होऊ लागतात. कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार.”, अशी टीका निलेश राणेंनी यावेळी केली.
निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात,
कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार. pic.twitter.com/1Rot33Ldct
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
“मी भाजपाची बदनामी करतो असे एखादं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावं”
मी, शहराला छत्रपती संभाजीनगर नाही, तर औरंगाबादच म्हणणार; शरद पवारांचं मोठं विधान
ज्यांना औरंग्याचे लाड करायचे आहेत त्यांना…; औरंगजेबाच्या फोटोवरुन मनसे आक्रमक