Home महाराष्ट्र …तर दंगली रोखण्यासाठी मागे पुढे काही पाहणार नाही; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराचा...

…तर दंगली रोखण्यासाठी मागे पुढे काही पाहणार नाही; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील समनापूर गावात काल दोन गटात वाद झाला. संगमनेरमध्ये काल सकाळी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यानंतर घरी परतत असताना, संगमनेरपासून 5-6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. यावेळी दगडफेकदेखील झाली.

त्यानंतर कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या सर्व प्रकरणावर, आता ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “मी भाजपाची बदनामी करतो असे एखादं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावं”

जे या सगळ्याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक शिक्षा व्हायला हवी, अशी स्पष्ट भूमिका अनिल परब यांनी यावेळी मांडली. ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, मागील 10 महिन्यांपासून महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत. विशेष म्हणजे वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. असेच वातावरण राहिले तर महाराष्ट्राचा विकास थांबू शकतो. कारण जे गुंतवणूकदार महाराष्ट्रात उद्योग आणू इच्छितात ते आणणार नाहीत. लोकांचे जिथे लक्ष असायला पाहिजे तिथून हटून दुसरीकडे जात आहे. या परिस्थितीत दंगलींना रोखायचे असेल तर विरोधी पक्ष मागे राहणार नाही. विरोधी पक्ष नक्की पुढे येईल. पण या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे व्हायला पाहिजे.

महत्त्वाच्या घडामोडी –

मी, शहराला छत्रपती संभाजीनगर नाही, तर औरंगाबादच म्हणणार; शरद पवारांचं मोठं विधान

ज्यांना औरंग्याचे लाड करायचे आहेत त्यांना…; औरंगजेबाच्या फोटोवरुन मनसे आक्रमक

“रोहित पवारांची पुण्यात मोठी घोषणा, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडणार ‘ही’ मोठी गोष्ट”