Home पुणे “रोहित पवारांची पुण्यात मोठी घोषणा, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडणार ‘ही’ मोठी गोष्ट”

“रोहित पवारांची पुण्यात मोठी घोषणा, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडणार ‘ही’ मोठी गोष्ट”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार तसेच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी आज पुण्यात एक मोठी घोषणा केली आहे.

पुण्यातील गहुंजे मैदानात एमपीएल म्हणजेच महाराष्ट्र प्रिमियर लिगचा लिलाव पार पडला. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी पुढील वर्षी महिलांची MPL स्पर्धा आयोजित करणार असल्याची घोषणा केली. या स्पर्धेत चार संघांचा सहभाग असेल, असं रोहित पवारांनी यावेळी सांगितलं. लिलाव पार पडल्यानंतर रोहित पवार यांनी संवाद साधला.

लिलावात खेळाडूंना मिळालेल्या बोलीवरून त्यांचा दर्जा अधोरेखित केला जाऊ नये. आमच्यासाठी प्रत्येक खेळाडू अमूल्य आहे. एमपीएलमुळे महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. यामुळे भविष्यात आयपीएल आणि अन्य भारतीय संघांतून महाराष्ट्राचे अधिक खेळाडू खेळताना दिसतील असा विश्वास वाटतो. एमपीएलमधून मिळणारा निधी हा क्रिकेटच्या प्रोत्साहनासाठीच वापरला जाणार आहे. यामुळे एमसीएच्या कार्यकक्षेतील 21 जिल्ह्यांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असा विश्वास रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“…तर मी राजकारण सोडेन; शिवसेना खासदाराच्या आरोपांवर अजित पवार, आक्रमक”

भाजपमध्ये पुन्हा घरवापसी करणार?; एकनाथ खडसेचं मोठं विधान, म्हणाले…

“प्रकाश आंबेडकर राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत”