Home महाराष्ट्र …म्हणून शरद पवारांनी, अजित पवारांना माघारी बोलवलं; मनसे नेत्याचं मोठं विधान

…म्हणून शरद पवारांनी, अजित पवारांना माघारी बोलवलं; मनसे नेत्याचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत 2019 साली 72 तासांच सरकार स्थापन केलं होतं. यावेळी झालेल्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं होतं.

अजित पवारांसोबत झालेला शपथविधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांशी चर्चा करूनच झाला होता, असा गाैफ्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केला होता. यावरून आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “सर्वात मोठी बातमी! कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीत मनसेचा भाजपला पाठिंबा”

शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर 45 मिनिट बैठक झाली होती. शरद पवारांना अंधारात ठेऊन अजित पवार देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतात, हे न पचण्यासारखं आणि न पटण्यासारखं आहे. अजित पवार शरद पवारांना न विचारता गोष्टी करतील, यावर कोणाही विश्वास ठेवणार नाही. ही घटना घडल्यानंतर शरद पवारांना वाटलं असेल, मी पावसात भिजून कमवलेले, या घटनेने जाऊ शकतं. म्हणून अजित पवारांना माघारी बोलवलं, असा टोला महाजन यांनी यावेळी लगावला. ते एबीपी माझाशी बोलत होते.

दरम्यान, अजित पवारांनी शरद पवारांना न विचारता देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतली, तर ते गद्दार आहेत. अजित पवार खरच गद्दार असते, तर शरद पवारांनी त्यांना माफी देऊन उपमुख्यमंत्री केलं नसतं., असंही महाजन म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“लगान चित्रपटातील ‘हा’ अभिनेता काळाच्या पडद्याआड”

“ठाकरेंचा यशस्वी डाव; ‘या’ निवडणूकीत ठाकरेंचं वर्चस्व, भाजपला दिला पराभवाचा धक्का”

पहाटेच्या शपथविधीवरून, देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, शरद पवारांशी…