Home महाराष्ट्र …तर किरीट सोमय्याचं थोबाड लाल करू; औरंगाबादच्या सभेत शिवसेनेचा इशारा

…तर किरीट सोमय्याचं थोबाड लाल करू; औरंगाबादच्या सभेत शिवसेनेचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद याठिकाणी जाहीर सभा होत आहे. या सभेला शिवसेनेच्या नेत्यांसह अनेक पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक हजर राहिले आहेत. मात्र याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जनतेला संबोधित करताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

येथून पुढे जर शिवसेनेविरोधात काही बोललात तर थोबाड लाल करू, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्यांना इशारा दिला आहे.

हे ही वाचा : पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाही?; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

किरीट सोमय्या हे फालतू असून मी त्यांना शक्ती कपूर म्हणतो, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केली. जसा उद्धव ठाकरे यांना भाजपवाल्यांनी धोका दिला, तसाच धोका मला औरंगाबादमध्ये भाजपने दिला. भाजपवाल्यांनी ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचं काम केलं आहे. किरीट सोमय्या हे सातत्याने आपलं थोबाड वाकडं करून उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील सोमय्या त्यांचा एकेरी शब्दांत उल्लेख करतात. त्यामुळे औरंगाबाद मध्ये येऊन किरीट सोमय्यांनी अशा प्रकारे विधानं केली तर, त्यांचं थोबाड लाल करू, असा इशारा खैरे यांनी सोमय्यांना यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

विधानपरिषदेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्याही उमेदवारांची नावे निश्चित; ‘या’ जुन्या नेत्यांना मिळणार संधी

विधानपरिषदेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्याही उमेदवारांची नावे निश्चित; ‘या’ जुन्या नेत्यांना मिळणार संधी

“महाराष्ट्राच्या खलीला तुमच्या मदतीची गरज; मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत का केली विनंती?”