Home महाराष्ट्र किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात नो एन्ट्री; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रवेशबंदीची नोटीस

किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात नो एन्ट्री; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रवेशबंदीची नोटीस

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नोटिशीनंतर किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

“हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची आणखी माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरला जाणार आहे. परंतु माझ्या दौऱ्यावर ठाकरे सरकारने प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्यासाठी माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवले आहेत. मला गणेश विसर्जनासाठीही जाऊ दिले जात नाही,” असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान,मी उद्धव ठाकरे यां ना चॅलेन्ज देतो. तुम्ही मला किती दिवस पोलीस ठाण्यात डांबून ठेवणार ? मी तुमचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…म्हणून किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात नो एन्ट्री”

जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री; कंगना राणौतचा उद्धव ठाकरेंना टोला

“पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांची निवड”

“पिंपरीमध्ये अजित पवार करेक्ट कार्यक्रम करणार?; भाजपच्या नाराज, बंडखोरांशी साधला संवाद”