Home महाराष्ट्र …म्हणून मी, दोन्ही दसरा मेळाव्याची भाषणं ऐकणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं...

…म्हणून मी, दोन्ही दसरा मेळाव्याची भाषणं ऐकणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं, यानंतर राज्यात शिंदे गटाविरूद्ध ठाकरे गट झाला आहे. यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाचा दसरा मेळावा कोणाचा होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी दोन्ही दसरा मेळावा भाषणं पाहणार नाही., असं फडणवीस म्हणाले. तसेच त्यामागचं नेमकं कारणही फडणवीसांनी यावेळी सांगितलं. फडणवीसांनी काल रात्री काळा चौकी येथील मराठी दांडियाला हजेरी लावली होती. त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : …तर शिवसेनेचं धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे; कायदेतज्ञ उज्वल निकम यांचं मोठं विधान

मी दोन्ही दसरा मेळावा भाषणं पाहणार नाही. त्यावेळी मी नागपुरात धम्म चक्र परिवर्तन कार्यक्रमात सहभागी होणार आहे, अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. तसेच दोन्ही दसरा मेळावा अत्यंत व्यवस्थित पार पडतील. कायदा आणि सुव्यवस्थेचं कठोर पालन केलं जाईल. मात्र, सध्या जी परिस्थिती आहे, त्याकडे कोणीही दुर्लक्ष करून चालणार नाही. देशविघातक कृत्य करणाऱ्या कोणीही या गर्दीचा गैरफायदा घेऊ नये. अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे गटात प्रवेश केलेल्या वरळीतील ‘त्या’ शिवसैनिकांची शिवसेनेत गृहवापसी? ठाकरेंसोबत असल्याची दिली ग्वाही

…तर मी उद्धव ठाकरेंच्या दसऱ्या मेळाव्याला प्रमुख पाहूणा म्हणून जाईन; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं विधान

शिंदे गट आणि ठाकरे गट येणार आमने-सामने; या ठिकाणी होणार पहिली निवडणूक