आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या 6 महिन्यांपासून चालू असलेल्या मराठा आंदोलनाला अखेर यश आलं आहे. काल मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं राजपत्र जरांगेंकडे सुपूर्द केलं.
तसेच त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी येथे आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवलं. मराठा आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे राज्य सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ही मागणी राज्य सरकारने मागे घेतली आहे. या सर्व प्रकरणावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : ‘मराठा आरक्षणावर राज्यपालांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…’
मराठा आंदोलकांवर जिथे-जिथे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतरवाली सराटी असो किंवा इतर ठिकाणचे गुन्हे निश्चितच मागे घेतले जातील. परंतु, घरं जाळल्याची प्रकरणं, पोलिसांवर थेट हल्ला, इतर वास्तूंची जाळपोळ करणे, बसेसची जाळपोळ करणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांसंदर्भात आपल्याला (राज्य सरकार) निर्णय घेता येत नाही. न्यायालयाच्या आदेशाशिवाय आपण यामध्ये काहीच करू शकत नाही, आपण ते गुन्हे मागे घेऊ शकत नाही. त्यामुळे ते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. इतर गुन्हे आपण मागे घेत आहोत., असं फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘मराठा आरक्षणावर राज्यपालांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…’
कंगना भाजपमधून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्यं
भाजप म्हणते ‘हिंदू खतरे में’ तर मग तुम्ही…; प्रकाश आंबेडकरांची भाजपावर टीका