Home महाराष्ट्र “ठरलं तर! भीमशक्ती-शिवशक्ती युतीवर उद्या शिक्कामोर्तब?; ठाकरे-आंबेडकर उद्या करणार घोषणा?”

“ठरलं तर! भीमशक्ती-शिवशक्ती युतीवर उद्या शिक्कामोर्तब?; ठाकरे-आंबेडकर उद्या करणार घोषणा?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आता ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार असल्याचं स्पष्ट झालं असून या युतीबाबत उद्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे.

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबडेकर यांच्यात उद्या बैठक होत आहे. यानंतर या युतीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे ही वाचा : राज्यपालांनंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड यांचं शिवाजी महारांबद्दल वादग्रस्त विधान, म्हणाले…

दरम्यान, ठाकरे गट-वंचितची युतीबाबतची ही पहिली अधिकृत बैठक असेल. उद्या दुपारी 12 वाजता वांद्रेच्या सोफिटेल हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. या बैठकीनंतर भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येणार, असं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मनसेनं विजयी खातं उघडलं; जत ग्रामपंचायतीत मनसेच्या प्रियांका खिलारे यांची बिनविरोध निवड”

“राज्यपालांविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; उद्यापासून राज्य सरकारविरोधात निषेध आंदोलन करणार”

जातिवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे; राष्ट्रवादीचा पलटवार