Home नागपूर “धक्कादायक! नागपूरमध्ये वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं”

“धक्कादायक! नागपूरमध्ये वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं”

नागपूर : नागपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नागपूर सक्करदरा चाैकात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

वाहतूक पोलीस वाहन चालकांची तपासणी करत असताना हा प्रकार घडला आहे. कार चालकाने वाहतूक पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्नही केला. पण पोलिसाने प्रसंगावधान राखत बोनेटवरून उडी घेतल्यानं त्याचा जीव थोडक्यात बचावला. चालकाने कार न थांबविता वाहतूक पोलिसाला तब्बल 500 मीटर अंतरापर्यंत बोनेटवरून फरफटत नेलं.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नितीन राऊत यांचा गेम केला”

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात; सोशल मिडियावर फोटो व्हायरल

“भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन”

Breaking News!”अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेेनेत प्रवेश करणार”