Home महाराष्ट्र राणेंच्या बालेकिल्यात शिवसेनेचं वर्चस्व; सिंधुदुर्गमध्ये इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

राणेंच्या बालेकिल्यात शिवसेनेचं वर्चस्व; सिंधुदुर्गमध्ये इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमध्ये भाजपला मोठे खिंडार पडलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी तालुक्यात असलेल्या इतर पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत भाजपला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत फोंडा येथे शिवसेना विभाग कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विनायक राऊत यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

हे ही वाचा : “पुढील अनेक दशकं भारतीय राजकारणावर भाजपचेच वर्चस्व राहणार, काँग्रेसने भ्रमात राहू नये”

दरम्यान, असाच पक्षप्रवेशाचा सोहळा वैभववाडी इथे कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात पार पडला. यावेळीही विरोधी पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“एका महिलेशी बोलताना भाषा कशी वापरली पाहिजे पवार साहेबांनी शिकवलं नाही का?”

“एका महिलेची बदनामी होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?”

‘…तर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा’; भाजपच्या ‘या’ नेत्यांची मागणी