शिवसेनेचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता शिवबंधनात अडकला

0
1509

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठ्याप्रमाणात इनकमिंग सुरू झलं आहे. अशातच अमरावती लोकसभा मतदार संघात शिवसेनेने काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. या मतदार संघातील प्रदेश युवक काँग्रेसच्या बड्या नेत्याला गळाला लावून आदित्य ठाकरेंनी अमरावतीत शिवसेनेला मोठी ताकद मिळवून दिली आहे.

महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे सरचिटणीस सागर देशमुख यांनी काल रात्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. सागर देशमुख यांच्यासोबत इतरही प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधत पुढील वाटचालीला सुरूवात केली.

दरम्यान, त्यांच्या या पक्ष प्रवेशापामुळे शिवसेनेला अमरावतीत मोठी ताकद मिळाली असून, काँग्रेसला मात्र जबर धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ड्रग्सप्रकरणी नवाब मलिकांचा भाजपावर आरोप; आता मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

वसुली आली की या सरकारचा `ससा` होतो आणि शेतकर्‍यांच्या मदतीवेळी ‘कासव’; फडणवीसांची टीका

शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात; भाजपच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

‘तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर धाडीही पडल्या नसत्या’; रावसाहेब दानवेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here