100 कोटींच्या आरोपांवर शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचं किरीट सोमय्यांना आवाहन, म्हणाले…

0
321

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. सोमय्या यांनी काल बोलताना शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला.

हे ही वाचा : “मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच; राज ठाकरेंकडून प्रबोधनकारांना श्रद्धांजली अर्पण”

अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे आणि त्याची तक्रार ईडी आणि आयकर विभागाकडे केली असल्याची माहिती सोमय्या यांनी काल दिली. यावरून आता अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली.

किरीट सोमय्यांच्या आरोपावर खोतकर यांनी थेट सोमय्या यांनाच आव्हान दिलं आहे. मी अजून किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद बघितली नाही. सोमय्या जे बोलत आहेत त्यांचा बोलाविता धनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आहेत. जर कारखाना शंभर कोटींचा असेल तर कारखाना मालकाला बोलून किरीट सोमय्या यांना हा कारखाना शंभर कोटीमध्ये द्यायला लावू. असं आवाहन खोतकर यांनी सोमय्यांना यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रालाही 2 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालं, आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला; संजय राऊतांची टोलेबाजी

“चित्रा वाघ यांची आमदारकीची संधी हुकली; भाजपकडून ‘या’ उमेद्वाराला संधी”

एसटीच्या महिला कर्मचारी अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार- गोपीचंद पडळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here