“शिंदेंचा आता मनसेला दणका; ठाकरे गटानंतर आता मनसेच्या ‘या’ नेत्यानं केला शिंदे गटात प्रवेश”

0
570

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड करत राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर अनेक पक्षांचा शिंदे गटाकडे जाण्याचा कल वाढला. आता अशातच मनसेचाही नंबर लागला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नागपूर महिला शहर अध्यक्ष मनिषा पापडकर यांनी आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला. शिंदे गटाचे पूर्व विदर्भाचे प्रमुख किरण पांडव यांच्या हस्ते पापडकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

हे ही वाचा : नाॅट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील आज विभागीय कार्यालयात दाखल, म्हणाल्या…

दरम्यान, पक्षप्रवेशानंतर आपण लवकरच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं पापडकर यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“नाशिकमध्ये मनसेला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश करणार”

नारायण राणेंवर टीका करताना, खासदार संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले…

अजित पवारांचा पुण्यात अपघात; म्हणाले, थोडक्यात वाचलो अन्यथा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here