“शिंदे-फडणवीस सरकार ‘या’ तारखेला कोसळणार”

0
742

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आता हिंदुत्वाचा मुद्दा व्यापक करण्यासाठी राज्यात हिंदू गर्व गर्जना यात्रा काढणार आहे. या यात्रेआधी एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना 1 हजार रुद्राक्षांच्या माळा भेट दिल्या आहेत. यावरून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी 1 हजार रुद्राक्ष असलेली माळ भेट दिली आहे. मात्र शिंदेंचे हिंदुत्व फक्त दिखावा, ढोंगीपणा आहे. हे डुप्लिकेट हिंदुत्वादी आहेत. आम्हीच खरे हिंदू आहोत, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये कसा निसटला?; राज ठाकरेंचा सवाल, आता एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘गर्व से कहो हम हिंदु है…. संपूर्ण देशात फक्त बाळासाहेब ठाकरेच हे ब्रीदवाक्य प्रसिद्ध आहे. हे ब्रीदवाक्यही ते घेत असतील तर हा त्यांचा ढोंगीपणा आहे, असंही चंद्रकांत खैरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मला म्हणतात देवपूजा करून सरकार कोसळत काय? आता पहा 27 तारखेला पहा काय होतं ते? माझ्या हातात रुद्राक्षांची माळ असते. गळ्यातही असते…, असं म्हणत त्यांनी रुद्राक्षांची माळही काढून दाखवली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“बंडखोरीचा शिवसेनेला फायदा; शेकडो वकिलांनी ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”

मनसेच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचा आरोप; निवडणुकीत तिकीट देण्याचं आमिष दाखवून घेतला गैरफायदा

भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का ; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here