Home पुणे महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात शरद पवारांचा चमत्कार- उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात शरद पवारांचा चमत्कार- उद्धव ठाकरे

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या कार्यक्रमा निमीत्त एकाच मंचावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात शरद पवारांचा चमत्कार आहे,  असं ते म्हणाले आहे.

दोन लाखांपर्यतचं कर्ज माफ करण्यात आलं आहे. तसेच 2 लाखांवरील कर्जदारांसाठी योजना आणणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नियमित कर्ज भरणाऱ्यांचाही विचार करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी  म्हटलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र, महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे भाष्य केलं. कमी आमदार असूनही आम्ही सरकार स्थापन करून दाखवलं. हे सरकार आणण्यामागे शरद पवारांनी चमत्कार करुन दाखला, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

-अमृता फडणवीस यांनी केलेल्या टिकेवर रोहित पवार म्हणतात…

-देशातील भाजपची भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाली- शरद पवार

-ही तुम्हाला असहिष्णुता वाटत नाही का? आशिष शेलारांचा शरद पवारांना सवाल

-स्मार्टफोन कंपनी Apple ‘हा’ APP प्ले स्टोअरमधून हटवला