“शरद पवार साहेब आता तरी खोटं बोलणं बंद करा आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या”

0
141

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजप नेत्यांनी गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही शरद पवारांवर टीका करत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज्याचे गृहमंत्री क्वारंटाईनमध्ये असताना 8-10 लोकांबरोबर विमान प्रवास करतात. पवार साहेब आता वयोमानाप्रमाणे तुम्हाला खोटं बोलनंही जमत नाही. वारंवार तुम्ही उघडे पडताय, खरतर खोटं बोलन्यात तुमची मास्टरकी आहे. मात्र खंडणीखोर गृहमंत्र्यांविषयी तुम्ही खोटं बोलताय, असं म्हणत अतुल भातखळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.

दरम्यान, शरद पवार साहेब आता तरी खोटं बोलणं बंद करा आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या, असंही अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

अनिल देशमुख 15 फेब्रुवारीला काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…

भारत विरूद्ध इंग्लंड वनडे! इंग्लंडने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय

राज्यात काहीही झालं तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होतेच; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

काँग्रेसला मोठा धक्का! ‘हा’ माजी आमदार राष्ट्रवादीत करणार प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here