Home महाराष्ट्र अनिल देशमुख 15 फेब्रुवारीला काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…

अनिल देशमुख 15 फेब्रुवारीला काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज काय मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर याबाबत देवेंद्र फडणवीसांनी आज मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी होम क्वॉरंटाईन नव्हते. ते एका खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्या दिवशी ते अनेकांना भेटले होते, असं म्हणतच शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली असून आता देशमुख एक्सपोज झाले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आपण नेहमी मराठीत आणि हिंदीत बोलतो. पण शरद पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. त्यामुळे मी हिंदीत सुरुवातीला बोलेल त्यानंतर मराठीत बोलेले. पवारां इतकं माझं इंग्रजी चांगलं नाही. त्यामुळे मी हिंदीत बोलतो, अशी सुरुवात करत फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेचा रोख काय असणार आहे हे स्पष्ट केलं.

दरम्यान, काल पवारांना योग्य ब्रिफिंग दिली जात नव्हते. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. देशमुखांना प्रोटेक्ट केलं गेलं. त्यामुळे ते एक्सपोज झाले होते. 15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते. त्या दिवशी त्यांना अनेक लोक भेटले होते, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

भारत विरूद्ध इंग्लंड वनडे! इंग्लंडने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय

राज्यात काहीही झालं तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होतेच; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

काँग्रेसला मोठा धक्का! ‘हा’ माजी आमदार राष्ट्रवादीत करणार प्रवेश

“आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा”