येवल्यातील सभेत बोलताना शरद पवार भावूक, म्हणाले, मी इथे माफी मागायला आलोय, कारण…

0
368

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी बंड करत 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिलीच सभा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात झाली. पवार यांनी नाशिकच्या येवला येथे सभेला संबोधित केलं.

ही बातमी पण वाचा : “महाराष्ट्राचा इतिहास दबावाखाली बाजू बदलणाऱ्या, खंडोजी खोपडेंचा नाही तर…; “

आज मी इथे का आलोय? मी इथं कोणाचं कौतुक करण्यासाठी आलो नाही किंवा कोणावर टीका करण्यासाठीदेखील आलो नाही. मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलोय. मी मतदारांची माफी मागायला आलोय., असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, माफी मागतोय कारण माझा अंदाज चुकला. माझे अंदाज फारसे चुकत नाहीत. पण इथं मात्र माझा अंदाज चुकला. माझ्या निर्णयामुळे तुम्हालाही यातना झाल्या असतील. तर माझं कर्तव्य आहे की, मी तुमची माफी मागितली पाहिजे., असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजपला मोठा धक्का; चार माजी नगरसेवकांसह पाचशे कार्यकर्ते बीआरएसमध्ये दाखल

“मोठी बातमी! शिंदे गटाचे ‘ते’ आमदार अपात्र ठरणार?; विधानसभा अध्यक्ष नोटीस बजावणार”

 तुमची असेल-नसेल ती, सगळी ताकद लावा अन्…; येवल्यातील जाहीर सभेतून शरद पवारांचं, पंतप्रधान मोदींना जाहीर आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here