मुंबई : निसर्ग चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मदत करण्याविषयी सरकारला सूचना केल्या.
सर्व भागातील नुकसान पाहता प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामे करून त्याची आकडेवारी घ्यायला हवी. यात सर्वप्रथम विद्युत व पाणी पुरवठा कसा सुरळीत करता येईल यावर भर द्यायला हवा. या भागातील फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची निकड मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली. जेणेकरून या भागातील शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल, अशी सूचना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
चक्रीवादळात घरे, बागा यांचे मोठे नुकसान झाले आहे. भिंती-छप्परे आणि झाडे पडल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. हे कचऱ्याचे ढिगारे साफ करून घरे, बागा व दुकाने स्वच्छ करावी लागतील. हे मोठे काम असल्याने यासाठी रोजगार हमी योजनेचा वापर केला जावा, असंही शरद पवार म्हणाले.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसीय दौरा केला. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीत व स्थानिकांशी केलेल्या संभाषणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीबाबत आज राज्याचे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. pic.twitter.com/jPh00F8ECC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 11, 2020
महत्वाच्या घडामोडी-
राष्ट्रवादीच्या आमदारकीच्या ऑफरवरून राजू शेट्टींची प्रतिक्रिया; म्हणाले…
राज्य सरकारने चक्रीवादळग्रस्तांना जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी- देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही- नारायण राणे
शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे; बापाला मुलाचं ज्ञान कमीच वाटतं- देवेंद्र फडणवीस