Home महत्वाच्या बातम्या राष्ट्रवादीच्या आमदारकीच्या ऑफरवरून राजू शेट्टींची प्रतिक्रिया; म्हणाले…

राष्ट्रवादीच्या आमदारकीच्या ऑफरवरून राजू शेट्टींची प्रतिक्रिया; म्हणाले…

कोल्हापूर : राज्यपाल कोट्यातून काही जागा भरल्या जाणार असून त्यातल्या एका जागेवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं, अशी खुली ऑफर राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांना दिली आहे. राष्ट्रवादीच्या या ऑफरवर राजू शेट्टींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या समझोत्याप्रमाणे, विधानपरिषदेची एक जागा देण्याबाबत ठरलं होतं. त्यावेळी आम्हाला काही देता आलं नाही, पण आता पवारसाहेब कोकण दौऱ्यावरुन मुंबईत आल्यावर चर्चा करुन निर्णय करण्याचा प्रयत्न करु, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीची ही ऑफर स्वीकारायची की नाही हा निर्णय त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर घेऊ. मी फक्त जे ठरलं आहे त्याची आठवण करुन दिली. मला वाटतंय आठवडाभरात पवार साहेबांसोबत बैठक होईल. त्यावेळी होय की नाही ते ठरेल, असंही राजू शेट्टी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

राज्य सरकारने चक्रीवादळग्रस्तांना जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही- नारायण राणे

शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे; बापाला मुलाचं ज्ञान कमीच वाटतं- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना आमदारकीची खुली ऑफर; तशी शरद पवारांचीच इच्छा