Home महाराष्ट्र तरुणांनो घराबाहेर पडून मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्या- रोहित पवार

तरुणांनो घराबाहेर पडून मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्या- रोहित पवार

मुंबई : लॉकडाउन शिथील होत असल्याने आता योग्य ती काळजी घेऊन लोकांनी घराबाहेर पडलं पाहिजे. तसंच तरुणांनो मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्या, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि युवा आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.

कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाउन केल्याने गेली काही महिने आपण घरातच आहोत. पण आता परिस्थिती बदलतेय व लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणलीय. तरीही लोकांमध्ये अजून भीतीचं वातावरण आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

मुलांनी आता पालकांवर जबाबदारी न टाकता त्यांची काळजी घेऊन आणि स्वतः पुढं येऊन जबाबदारी घ्यायला पाहिजे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी नोकरीला गेल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोर पाळून पुन्हा घरी जाणं टाळायला पाहिजे, असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आज खासगी क्षेत्रांत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. हे आणखी किती काळ चालेल माहित नाही. म्हणून कोणत्याही कामाला लहान मोठं न समजता मिळेल तिथे कामाला सुरुवात करायला पाहिजे. पण आपण असेच घरात बसून राहिलो तर अडचणी वाढू शकतात, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

https://www.facebook.com/RRPspeaks/posts/942378429559233

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; सरकारला केल्या महत्त्वाच्या सूचना

राष्ट्रवादीच्या आमदारकीच्या ऑफरवरून राजू शेट्टींची प्रतिक्रिया; म्हणाले…

राज्य सरकारने चक्रीवादळग्रस्तांना जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही- नारायण राणे