शरद पवार हे आमचे कुटूंबप्रमुख, त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला सूचना देण्याचा त्यांना अधिकार- जयंत पाटील

0
246

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ आणखी इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ पवारांचा समाचार घेतला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमच्या कुटूंबाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबातील प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार आहे. त्यात वावगं असं काही नाही. त्यामुळे याबाबत अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, या बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ही बैठक पूर्वनियोजित होती. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पवार कुटुंबीय यांच्यात कोणताही वाद नाही.” असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवारांनी घेतलेली ‘ती’ भूमिका योग्य- देवेंद्र फडणवीस

“राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा”

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं कोरोनामुळे निधन

यंदाच्या आयपीएलमध्ये विराटच्या आरसीबी संघात ‘आदित्य ठाकरे’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here