“नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, त्याकडे फारसं लक्ष देऊ नका”

0
331

पुणे : अमित शाह यांच्या पायगुणामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असं वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं होतं , त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे. ते रविवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हतं. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावं, असं शरद पवार म्हणाले.

नारायण राणेंच्या वक्तव्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी

सचिन तेंडुलकरने आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी- शरद पवार

राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार असताना औरंगाबादचं संभाजीनगर का झालं नाही?- राज ठाकरे

अर्जुन तेंडुलकर IPL मध्ये खेळणार; ‘या’ संघाकडून प्रतिनिधीत्व करण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here