पुणे : मराठा आरक्षणासाठी सोमवारी छत्रपती संभाजीराजे यांनी उदयनराजेंची पुण्यात भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजेंनी संभाजीराजेंच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. तर संभाजीराजे यांनी अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचं सांगितलं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संभाजीराजे यांनी आंदोलन करण्याऐवजी त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. पण आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीत सर्वांना आहे. त्यांनी आंदोलन करावं पण करोना वाढणार नाही याची काळजी घेऊन करावं, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे त्यावर 5 जुलै रोजी होणाऱ्या राज्याच्या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल”
“राम मंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत”
“…तर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल”
“मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा”