Home महाराष्ट्र “सांगली न्यूज! रोहित पाटील, सुमनताई पाटील यांच्या लढ्याला अखेर यश, आश्वासनानंतर उपोषण...

“सांगली न्यूज! रोहित पाटील, सुमनताई पाटील यांच्या लढ्याला अखेर यश, आश्वासनानंतर उपोषण मागे”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील आणि सुमनताई पाटील यांनी आपले अन्नत्याग उपोषण मागे घेतले आहे.

सावळज आणि इतर 8 गावांचा समावेश टेंभू योजनेत करावा, या मागणीसाठी आमदार रोहित दादा पाटील आणि सुमनताई पाटील उपोषणाला बसल्या होत्या. अखेर सरकारने मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी हे उपोषण सोडले आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या नातवाचा कार अपघात; जागीच झाला मृत्यू

दरम्यान, याबाबतची अधिक माहिती अशी की, टेंभू योजनेतून तासगाव आणि कवठेमहांकाळमधील 19 गावांना पाणी मिळावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. काल महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी हे उपोषण केले होते. त्यांच्या या उपोषणाची अनेक नेत्यांनी दखल घेतली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला होता. अखेर त्यांच्या या लढ्याला अखेर यश आले असून राज्य राज्य सरकारने उपोषणाच्या पार्श्वभूमीवर टेंभूच्या विस्तारित योजनेसाठी 8 टीएमसी पाणी देण्यास मान्यता दिली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

दसरा मेळाव्यावरून संजय राऊतांची शिंदे सरकारवर टीका; आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

“घटस्थापनेपूर्वी शरद पवार, भाजपमध्ये प्रवेश करतील, ‘या’ आमदाराच्या दाव्याने खळबळ”

मोठी बातमी! ‘या’ मुद्द्यांवरुन अजित पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी