Home महाराष्ट्र मोठी बातमी! ‘या’ मुद्द्यांवरुन अजित पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये...

मोठी बातमी! ‘या’ मुद्द्यांवरुन अजित पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. पण राज्य सरकारने तसं करु नये, यासाठी ओबीसी समाजाकडून राज्यभर आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक महत्त्वाचे मंत्री आणि नेते या बैठकीला हजर होते. यावेळी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात ओबीसींच्या मुद्द्यांवरुन आहेत जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई, 72 तासात प्लांट बंद करण्याच्या सूचना”

छगन भुजबळ यांनी बैठकीत मंत्रालयात काम करणाऱ्या ओबीसी समाजाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आकडेवारी मांडली. ओबीसींवर अन्याय होतोय. ओबीसी समाजाचे कमी अधिकारी मंत्रालयात आहेत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. यावर अजित पवार यांनी आक्षेप घेतला.

ही माहिती साफ चुकीची आहे. ही माहिती खरी असेल तर भुजबळांनी याबाबतचे पुरावे दाखवावे, असं अजित पवार म्हणाले. यानंतर पुन्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

महत्त्वाच्या घडामोडी – 

‘तुरूंगात असताना छगन भुजबळ शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे’; राष्ट्रवादी नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

“…या कारणामुळे भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर”

“IPL मध्ये विराटला नडणाऱ्या ‘या’ खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, 24 व्या वर्षी केली निवृत्तीची घोषणा”