Home महाराष्ट्र “मोठी बातमी! आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई, 72 तासात प्लांट बंद...

“मोठी बातमी! आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई, 72 तासात प्लांट बंद करण्याच्या सूचना”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बारामती : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो प्लान्ट कंपनीवर राज्य शासनाच्या एका विभागाने कारवाई केली आहे.

येत्या 72 तासात प्लान्ट बंद करण्याची सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या प्रदुषण मंडळाने बारामती ॲग्रो प्लान्टला नोटीस दिली आहे. रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत, राज्यातील 2 मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून, द्वेष मनात ठेवून ही कारवाई झाल्याचा दावा, रोहित पवार यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘तुरूंगात असताना छगन भुजबळ शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे’; राष्ट्रवादी नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मी बोलतो म्हणून माझ्यावर कारवाई झाली आहे. पण मी संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे मी घाबरणार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ट्विट करत रोहित पवार यांनी माहिती दिली आहे. या ट्विटच्या माध्यमातून रोहित पवार यांनी दोन नेत्यांवर निशाणा साधलाय. त्यामुळे हे दोन नेते कोण? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“…या कारणामुळे भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर”

“IPL मध्ये विराटला नडणाऱ्या ‘या’ खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, 24 व्या वर्षी केली निवृत्तीची घोषणा”

“सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेद्वार?, पंकजा मुंडे यांचं पक्षात स्वागत”