आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : सांगली जिल्हा बँक निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात कवठेमहांकाळ सोसायटी गटात शिवसेनेचं वर्चस्व पहायला मिळालं.
हे ही वाचा : “सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुक निकाल; शशिकांत शिंदे-शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का”
कवठेमहांकाळ गटातून महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अजितराव घोरपडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. घोरपडे यांना 54 मते मिळाली तर अपक्ष उमेद्वार विठ्ठल पाटील यांना 14 मतं मिळाली.
दरम्यान, दुसरीकडे जत सोसायटी गटात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ विक्रम सावंत यांना पराभवाचा धक्का बसला. त्यांचे विरोधक असलेल्या भाजपच्या प्रकाश जमदाडे यांनी सावंत यांना पराभवाचा धक्का दिला. जमदाडे यांना 45 मतं मिळाली तर विक्रम सावंत यांना 40 मतांवरच समाधान मानावं लागलं.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेचा भाजप मनसेला मोठा धक्का; भाजपचे तीन नगरसेवक तर मनसेचे कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश
“ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, तसेच पुन्हा आरक्षण मिळवून द्यायला पाहिजे”
नवीन वर्षात भाजपची सत्ता येणार; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…