संभाजीराजे हे आमचे छत्रपती, मात्र शिवसेनेवरील टिका खपवून घेतली जाणार नाही

0
661

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडलं. या निवडणूकीत भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. या पराभवानंतर संजय पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधत संभाजीराजे छत्रपती यांच्यावर निशाणा साधला.

हे ही वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज 54 वा वाढदिवस; वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

संभाजीराजे हे आमचे छत्रपती आहेत, मात्र शिवसेनेवरील टिका खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा संजय पवारांनी यावेळी दिला. मराठा मावळा हरल्याचे पोस्टर लावणं हे अत्यंत दुर्देवी आहे. शिवसेनेकडे मतं मागायला तुम्ही आला होता. शिवसेनेचे वाघ जंगलातील आहेत, सर्कशीतील नाही. राज्यसभा निवडणूकीत कुठे दगाफटका झाला, याचा शोध वरिष्ठ घेत आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून आधार दिला. इथून पुढे शिवसेनेचे कोल्हापूरमध्ये जोरदार काम सूरू ठेवणार, असंही संजय पवार म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…म्हणून फडणवीसांनी आपणांस विश्रांतीचा सल्ला दिलाय; अमोल मिटकरींचा सदाभाऊ खोतांना टोला

काँग्रेसची मोठी खेळी; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानं असंख्य समर्थकांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश

विधानपरिषद निवडणुकीपूर्वी प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here