आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे अध्यक्ष संभाजी भिडे आणि वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण आता काही नवे राहिले नाही. संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
पुण्यातील दिघी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने संभाजी भिडे यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी संभाजी भिडे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा.15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिवस नाही. ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतलं. वंदे मातरम म्हटलं ते व्यर्थ नाही. आता ठाम निर्धार करायचा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्य पण ते हांडगं स्वातंत्र्य असेल. ते पत्करलं पाहिजे, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : आम्ही भाजपसोबत आहोत, मात्र…; महादेव जानकर यांचा भाजपला गंभीर इशारा
जोपर्यंत भारताचा राष्ट्रध्वज भगवा म्हणून स्विकारला जात नाही तोपर्यंत शांत बसायचे नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाईसारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.
तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्विकारणारी ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटी नाही तर ऑल इंडिया गांडू कमिटी आहे असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण, रविन्द्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहलं होतं, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
विरोधी पक्षनेतेपद का नकोय?; अखेर अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले, अरे बाबा…
“पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला, मोठा धक्का, ‘हा’ मोठा नेता पक्षातून बाहेर पडणार”