पूरग्रस्त्यांना दिलेला शब्द सलमान खानने पाळला; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

0
191

नवी दिल्ली : बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान कोरोनाच्या महामारीमध्ये मदतीसाठी पुढे आला आहे. सलमानने कोरोनाच्या काळात अनेक गरजूंना मोठी मदत केली आहे. तसेच सलमानने महाराष्ट्रातील खिद्रापूर तालुक्यातील गावकऱ्यांना 2019 मध्ये आलेल्या पुरामुळे घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते आणि ते त्याने आता पूर्ण केलं आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

खिद्रापूर ता. शिरोळ येथील महापुरात पडझड झालेल्या घरांची पुनर्बांधनी करण्यासाठी एलान फाउंडेशन (दिल्ली) व अभिनेते सलमान खान यांनी जबाबदारी घेतलेल्या 70 घरांच्या पायाभरणीचा शुभारंभ पार पडला, असं राजेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर दारं कधीच उघडली असती; अतुल भातखळकरांचा राज्य सरकारवर निशाणा

पंढरपुरातील आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील- प्रकाश आंबेडकर

भाजपच्या घंटानादात सोशल डिस्टन्सिंगची काशी; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

नाणार प्रकल्पाबद्दल शिवसेना बोलायलाही तयार नव्हती पण आता…; निलेश राणेंचं शिवसेनेवर टिकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here