Home महाराष्ट्र पंढरपुरातील आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील- प्रकाश आंबेडकर

पंढरपुरातील आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील- प्रकाश आंबेडकर

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनासाठी रवाना झाले आहेत.

पंढरपूरमध्ये पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचे आंदोलन करणार आहोत. आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील. यापुढे मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मी सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी पटवून सांगणार आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

LIVE Updates:

  • आंदोलनाला अनेक वारकरी संघटनांचा पाठिंबा, मात्र आंदोलनात सहभागी वारकऱ्यांची संख्या अत्यल्प
  • पंढरपुरात सुमारे आठशे ते एक हजार कार्यकर्ते दाखल, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मोजक्या कार्यकर्त्यांना नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी पोलिसांची तयारी, प्रकाश आंबेडकर पोलिसांची विनंती कितपत आणि कशी मान्य करतात यावरच आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार
  • विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनासाठी अनेक कार्यकर्ते पंढरपुरात दाखल, वंचितच्या कार्यकर्त्यांना पंढरपूरमधील शिवाजी चौकात रोखले
  • प्रकाश आंबेडकर शासकीय विश्रामगृहात पोहोचले, थोड्याच वेळात जिल्हाधिकारीही शासकीय विश्रामगृहात पोहोचणार, त्यांच्याशी चर्चा झाल्यावर प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी जाणार, विश्रामगृहात वारकरी प्रतिनिधीही हजर
  • सोलापूरमधून वंचितचे कार्यकर्ते पंढरपूरकडे रवाना, खासगी बसेस करुन कार्यकर्ते पंढरपूरच्या दिशेने
  • प्रकाश आंबेडकर मोहोळ मध्ये पोहोचले. येथून पंढरपूरकडे निघाले असून मध्ये कुठेही थांबणार नाही.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपच्या घंटानादात सोशल डिस्टन्सिंगची काशी; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

नाणार प्रकल्पाबद्दल शिवसेना बोलायलाही तयार नव्हती पण आता…; निलेश राणेंचं शिवसेनेवर टिकास्त्र

सांगलीतील कोरोना मृत्यूचे प्रमाण देशात सर्वाधिक- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने आता अँटीबॉडी टेस्टवर जास्त भर द्यावी; मनसेची मागणी