आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं असून एक देश एक निवडणूक या विधेयकासाठी अधिवेशन बोलावण्यात आलं असावं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
“इंडिया दिवसेंदिवस मजबूत होत असल्याने भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महागाई, बेरोजगारी, सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती यांसारखे जनतेचे मूळ सरकारचा खरा चेहरा कळायला सुरुवात झाली आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : ‘स्वराज्य’ इंडिया आघाडीत सामील होणार?; संभाजीराजे छत्रपतींकडून स्पष्टीकरण, म्हणाले…
परिणामी , गेली दहा वर्षे जनतेला गृहीत धरून चालणाऱ्या केंद्र सरकारला सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा साक्षात्कार झाला, येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करणे यासारखे अजून खूप सारे साक्षात्कार होतील, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, निवडणुकांना जेवढा उशीर होईल ,पराभव देखील तेवढाच मोठा होईल हे भाजपला कळून चुकले आहे.त्यामुळे लोकांना सरकारचा खरा चेहरा समजण्यासाठी व इंडिया अधिक मजबूत होण्यासाठी अधिकचा वेळ मिळू नये, यासाठी भाजपा प्रयत्नशील असून लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.कदाचित त्यामुळेच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज पडली असेल ,हे नाकारता येणार नाही, असंही रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
#INDIA दिवसेंदिवस मजबुत होत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.#महागाई , #बेरोजगारी,सद्याची #दुष्काळजन्य परिस्थिती यासारखे जनतेचे मूळ मुद्दे आता चर्चेत येत असल्याने लोकांना #भाजपा सरकारचा खरा चेहरा कळायला सुरवात झाली आहे.
परिणामी , गेली दहा वर्षे जनतेला गृहीत धरून…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 31, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शरद पवारांनी सांगितली रणनीती, म्हणाले…
मविआच्या बैठकीतून शरद पवारांचा, अजित पवार गटाला इशारा, म्हणाले, त्यांना त्यांची जागा…
‘या’ मोठ्या नेत्याने सोडली भाजपची साथ; म्हणाले, ‘तुमची मोठी पार्टी, मग…’
“शरद पवारांचा मोठा डाव, एकनाथ खडसेंच्या कन्या, रोहित खडसेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”