Home जळगाव रोहिणीताई, राष्ट्रवादीनं तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू- जयंत पाटील

रोहिणीताई, राष्ट्रवादीनं तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू- जयंत पाटील

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांचं जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू, असं आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी दिलं.

15 टक्के मताधिक्याने रोहिणी खडसेंना निवडून आणू त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, असंही जयंत पाटील म्हणाले. ते मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी परिवार परिसंवाद यात्रेनिमित्त बोलत होते.

दरम्यान, जयंत पाटलांच्या या आश्वासनानं राष्ट्रवादीने पुढील विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंना उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी 

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या- चंद्रकांत पाटील

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळ वळण, पूजाच्या वडिलांनी सांगितलं आत्महत्येचे कारण; म्हणाले…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

पूजा चव्हाणला न्याय देण्याची धमक तुमच्यात नाहीच- अतुल भातखळकर