आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. अशातच आता राज्य सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देत निर्बंधांमध्येे शिथिलता दिली आहे.
हे ही वाचा : पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; ‘या’ नेत्याचा धक्कादायक दावा
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत काल केवळ एक हजार रुग्ण आढळून आल्याने मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच मुंबईत आजपासून नवीन नियमावली जाहीर झाली आहे.
अशी असेल आजपासून नवी नियमावली :
- मुंबईत रात्रीची संचारबंदी उठवली
2. मुंबईतली सर्व पर्यटनस्थळं सुरु होणार
3. स्पा आणि सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
4. अंत्यसंस्काराला उपस्थितीची मर्यादा नसेल
5. चौपाट्या, गार्डन, पार्क सुरू होणार
6. स्विमिंग पूल, वॉटरपार्क 50 टक्के मर्यादेने सुरू
7. रेस्टॉरंट, थिएटर्स, नाट्यगृहे 50 टक्के मर्यादेने सुरू
8. धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची परवानगी
9. लग्नासाठी 25 टक्के उपस्थितीची मर्यादा
10.खेळाच्या मैदानात 25 टक्के उपस्थितीची मर्यादा
महत्वाच्या घडामोडी –
Budget 2022 : काय स्वस्त होणार, काय महाग होणार? वाचा सविस्तर
आता नारायण राणेंना देशातला कायदा माहिती पडला असेल; नितेश राणेंचा जामीनीवरुन शिवसेनेची टीका
औरंगाबादेत शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत