नवाब मलिकांनी राज्यापालांच्या दाैऱ्यावर बोलण्यापेक्षा…; प्रवीण दरेकरांचा नवाब मलिकांना सल्ला

0
309

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद राज्यापालांच्या या दाैऱ्यावर नाराजी व्यक्त केली होती.

राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत तर ते राज्यपाल आहेत, हे त्यांनी समजून घ्यावं, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला होता. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

महामहिम राज्यपाल महोदयांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय गैर आहे? त्यांच्या दौऱ्यामुळे पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही!मा. नवाब मलिक जी त्यांच्या दौऱ्यावर राजकीय बोलण्यापेक्षा तुम्ही पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्या! नागरिकांचे प्रश्न लक्षात येतील., असा सल्ला दरेकरांनी नवाब मलिक यांना यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’; आशिष शेलारांचा घणाघात

शिवसेनेला सोडचिठ्ठी देत ‘या’ माजी राज्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

नवनीत राणांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून रूपाली चाकणकरांचा टोला; म्हणाल्या…

राहुल गांधी राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानी; संजय राऊतांची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here