मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी 14 जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंचं पत्र ट्विटरवर शेअर केलंय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या भागातील नागरिकांना मदत करा त्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील, असं पत्रामध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्र सैनिकांनी या काळात केलेल्या कामाचं कौतुक मला अनेक लोकांनी व्यक्तिश कळवलं. मी मनापासून सांगतो की मी खरचं भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले. आणि हो 14 तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
दरम्यान, कोरोनामुळे अनेकांना प्राण गमावावे लागले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातवरण आहे. आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
साहेब तुमची शाबासकी आम्हाला हत्तीचं बळ देते pic.twitter.com/JKnLxP2wkk
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 12, 2020
महत्वाच्या घडामोडी-
‘या’ कारणामुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी करणार स्वतंत्र चर्चा
तरुणांनो घराबाहेर पडून मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्या- रोहित पवार
शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; सरकारला केल्या महत्त्वाच्या सूचना
राष्ट्रवादीच्या आमदारकीच्या ऑफरवरून राजू शेट्टींची प्रतिक्रिया; म्हणाले…