Home बीड धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला

बीड: पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह, स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यामुळे मागील चार दिवसात मंत्री मुंडे व त्यांचे स्वीय सहाय्यकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःहून स्वविलगीकरण जावे, असं आव्हान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

धनंजय मुंडे मागील अनेक दिवसापासून परळीत मुक्कामाला होते. परळी येथील एक महिला औरंगाबाद येथे कोरोना बाधीत आढळली. याच महिलेच्या कुटुंबीयांच्या संपर्कात धनंजय मुंडे आले होते.

बीडहून मंत्रीमंडळ बैठकीसाठी मंत्री धनंजय मुंडे मुंबईत गेले. बैठकीत हजरही होतो. त्यांचा तपासणी अहवाल बाधित आल्यानंतर स्वीय सहाय्यक व इतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आल्यानंतर त्यांचेही अहवाल बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, मागील चार दिवसांत पालकमंत्री, त्यांचे निकटवर्तीय आणि स्वीय सहाय्यक यांच्या जवळच्या संपर्कात आल्या किंवा कागदपत्रांची देवाणघेवाण केलेली व्यक्तींनी, त्यांच्या संपूर्ण कुटुंबासमवेत 28 दिवस स्वविलगीकरण होऊन काटेकोरपणे काळजी घ्यावी आणि कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या शासकीय आरोग्य रुग्णालयात जावं, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

महत्वाच्या घडामोडी-

माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा… ; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

‘या’ कारणामुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी करणार स्वतंत्र चर्चा

तरुणांनो घराबाहेर पडून मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्या- रोहित पवार

शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; सरकारला केल्या महत्त्वाच्या सूचना