आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी काल माध्यमांशी बोलताना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता. शिवसेना सोडल्यावर मला मारण्याची सुपारी छोटा शकील, छोटा राजन टोळीला उद्धव ठाकरेंनी दिली होती, असा गंभीर आरोप नारायण राणेंनी यावेळी केला. यावरून आता शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
90 च्या दशकात राणे काय करत होते, हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. अशी लोकं आपण चर्चेत आले पाहिजे म्हणून अशा प्रकारची विधाने करत असतात. त्यांच्या विधानाला काही अर्थ नाही आणि त्यांच्या राजकीय भविष्याला महाराष्ट्रात थारा नाही, असं प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी यावेळी दिलं.
हे ही वाचा : “ठाकरे-शिंदेंना धक्का; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं”
केंद्रीय मंत्री म्हणून राणेंनी, सरकारच्या योजनांबाबत बोलणे अपेक्षित आहे. वेदांता प्रकल्पाबाबत ते कधी बोलले नाहीत. पण ठाकरे यांच्यावर कायम बोलतात. पण राणेंच्या आरोपांना त्याच पद्धतीने शिवसेनेकडून उत्तर देण्यात येईल , असा इशाराही वैभव नाईक यांनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“अजित पवारांचं, मुख्यमंत्री शिंदेंबद्दल मोठं विधान, म्हणाले, …तर या ही बाबाला घरी बसावं लागेल”
उद्धव ठाकरेंना आत्मचिंतनाची गरज; सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेना सल्ला
भाजपने विरोध केलेला आदिपुरूष चित्रपटाला आता मनसेचा पाठिंबा, म्हणाले…