रामदास आठवलेंनी कवीता करत केली राज्य सरकारकडे ‘ही’ मागणी

0
168

मुंबई : मनसेचे नेते राज ठाकरे यांनी महसुलाचा विचार करुन वाईन शॉप्स सुरु करावीत अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यावर गावा-गावतली म्हणते आहे पारु माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु” अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राज्य सरकारकडे वाईन शॉप्स सुरु करु नका अशी मागणी केली आहे.

लॉकडाऊनच्या मद्यविक्रीची दुकाने सुरू करू नका. थोड्या महसुलासाठी दारू ची दुकाने सुरु करू नका. गावागावातील बोलत आहे पारू माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारू। त्यामुळे दारूदुकाने लॉकडाऊन मध्ये बंदच असावीत, असं रामदास आठवले म्हणाले. यासंदर्भातला एक व्हिडीओच त्यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

माझं राज्य सरकारला निवेदन आहे, की लॉकडाउनच्या कालखंडात अनेक लोक जे दारु पित होते, दारुची दुकानं बंद असल्याने त्यांची दारु बंद झाली आहे. अनेक लोकांचे उद्ध्वस्त होणारे संसार सावरले जात आहेत. अनेक घरांमधल्या महिला खुश आहेत. गावा-गावतली म्हणू लागली आहे पारु आता माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु. अशा पद्धतीचं आनंदाचं वातावरण महिलांमध्ये आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, छोट्याश्या महसुलासाठी दारुची दुकानं सुरु केली तर मद्यपान करणाऱ्या लोकांना वाव मिळेल. त्यामुळे दारुची दुकानं सुरु करणं योग्य राहणार नाही असं माझं सरकारला निवेदन आहे, असंही आठवले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

राज ठाकरेंच्या ‘त्या’ सूचनेला छगन भुजबळांच समर्थनं; म्हणतात…

‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखा; खासदार अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला सल्ला

राज ठाकरेंच्या मागणी मागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना?; अग्रलेखातून सवाल

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी नागपुरात बसल्या बसल्या, लाख-दीड लाख पीपीई किट पाठवतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here