राजू शेट्टींनी स्वतःसाठी शरद पवारांकडे मागितलं होतं कॅबिनेट मंत्रीपद; ‘या’ माजी आमदाराचा गाैफ्यस्फोट

0
460

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाविकास आघाडी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राज्यात सूरू आहेत. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांनी एक मोठं विधान केलं आहे.

विधानसभेच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक शिष्टमंडळ पाठवून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे स्वतःसाठी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली होती, असा मोठा गौप्यस्फोट स्वाभिमाना पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : “शिवसेनेचा काँग्रेसला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

दरम्यान, स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांची अनामत रक्कम का वाचवता आली नाही, असा सवाल आमदार भुयार यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राजू शेट्टी यांनी आपल्या राजकारणासाठी आजपर्यंत फक्त सोयीच्याच भूमिका घेतल्या आहेत. त्यांना आता पुन्हा भाजपशी जवळीक साधायची आहे, असा आरोपही देवेंद्र भुयार यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचा काँग्रेसला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

कुणाल हातोडा, कुणाला कुदळ घ्यायची आहे ते घ्या, पण शिवरायांचा हा मर्द मराठा मावळा…; शिवसेनेचा सोमय्यांवर हल्लाबोल

जयदत्त क्षीरसागर अ‍ॅक्शन मोडमध्ये; राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते फोडले, ‘या’ दिवशी करणार शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here