Home महाराष्ट्र राजू शेट्टी सरड्यासारखे रंग बदलतात; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला

राजू शेट्टी सरड्यासारखे रंग बदलतात; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला

सांगली : दूध दर आंदोलनादरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माजी कृषी राज्य मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना भंपक आणि फालतू माणसासोबत पुन्हा काम करणार नाही असं म्हटलं होतं. यावरून इस्लामपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेटींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

आमच्यासारख्या फालतू माणसांमुळेच तुमची संघटना मोठी झाली. आमच्यासारख्या माणसांमुळेच तुम्ही आमदार, खासदार झालात हे विसरलात काय. मला तुमच्यासारखं सरड्यासारखे रंग बदलता येत नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी प्रसिद्धीत राहायचं असल्याने माझं नाव घेत असतात. पण मला त्या भंपक माणसाविषयी जास्त बोलण्याची इच्छा नाही. सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवा, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये”

न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; त्यामुळे…

सामनाचे संपादक तोंडावर पडले- नारायण राणे

जिम सुरू करा; सुप्रिया सुळेंची मागणी