Home महाराष्ट्र म्हाडा पेपरफुटी प्रकरणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

म्हाडा पेपरफुटी प्रकरणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात म्हाडाच्या विविध पदांकरिता परीक्षा आयोजित केली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ऑनलाईन पध्दतीने परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. मात्र हजारो विद्यार्थी बसेही बंद असताना प्रवास करत परीक्षा केंद्रावर उपस्थित आहेत. यावर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : तुम्ही हिंदू आहात तर…; चंद्रकांत पाटलांचं राहुल गांधींना आव्हान

या सर्व गोष्टी जनता गांभीर्याने घेत नाही. त्या वेळेपुरते चिडायचे, रागावायचे आणि निवडणुकांना मतदान भलत्याच विषयांवर केले जाते. निवडणुकांच्यावेळी सगळ्याच गोष्टी विसरल्या जातात. नको त्या विषयांवर मतदान करणार असाल तर तुमचा राग कधी व्यक्त करणार? असा सावाल करत  या लोकांना शिक्षा होईपर्यंत हे सुधारणार नाहीत. कारण यांना माहित आहे लोक दोन दिवसात विसरुण जाणार. त्यामुळे परिस्थिती सुधारत नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, लोकांनी पाच वर्षात जो त्रास सहन केलेला असतो तो ते विसरून जातात. आपल्या देशात लोकसभेची निवडणूक कांद्याच्या भावावर होत असेल तर काही होऊ शकते, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ते नाशिक दौऱ्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार तृणमूलमध्ये प्रवेश”

 ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना केवळ शरद पवारच एकत्र आणू शकतात- संजय राऊत

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच प्रश्न सुटत नाही तोपर्यंत…; नाना पटोलेंकडून भूमिका स्पष्ट