Home नागपूर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच प्रश्न सुटत नाही तोपर्यंत…; नाना पटोलेंकडून भूमिका स्पष्ट

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच प्रश्न सुटत नाही तोपर्यंत…; नाना पटोलेंकडून भूमिका स्पष्ट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात  उद्या महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाचे मत स्पष्ट आहे की जोपर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. सर्वोच्च न्यायालयात उद्या होणाऱ्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्यावतीनं उद्या हीच भूमिका मांडली जाणार आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवूनच या निवडणुका व्हाव्या, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

हे ही वाचा : भाजप-मनसे युतीबद्दल राज ठाकरे यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

ओबीसी आरक्षणाच्या विषयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालं आहे. राज्य सरकारनंही उद्याच्या सुनावणीसाठी चांगले वकील नेमलेले आहेत. ओबीसी आरक्षण कायम राहिल यासाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण झाली आहे, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी ओबीसी समाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सरसकट रद्द कराव्या, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक महिला पायलट भारतीय”

मुंबई महापालिकेत वंचित आघाडीची शिवसेना, काँग्रस सोबत होऊ शकते युती- प्रकाश आंबेडकर

रोहित पवारांच्या खेळीचा भाजपाला झटका! कर्जतमध्ये राष्ट्रवादी बिनविरोध